ॐ जय निंबामाता । ॐ जय निंबामाता ॥
दर्शनमात्रे होशी । पावन नीज भक्ता ॥धृ॥
सरस्वती लक्ष्मी महाकाली । निंबा प्रगटली माँ ।
संगमी स्वयंभू शिवजी । होई दुःख हरिता ॥१॥
विश्वगंगा गोमुख कमला । त्रिमूर्ती स्वरूपा । माँ ॥
स्नान करीती जीव जे । मोक्ष येई हाता ॥२॥
बालकदास नागबाबा । संत तुकडोजी। माँ ॥
तपोनिधी हे तपती । तव अंगणी माता ॥३॥
राक्षस वधोनी दुर्गा । निंबी शांत झाली । माँ ॥
तीन रुपें घेऊनी । त्रिमूर्ती मा प्रगटली निंबामात ॥४॥
वेदशास्त्र मुनीजन थकले । तव महिमा गाता । माँ ॥
विठ्ठलप्रसाद पामर दास । चरणी ठेवी माथा ॥५॥